Advertisement

देवेंद्र फडणवीस यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील सेंट जाॅर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
SHARES

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील सेंट जाॅर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २४ ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला, तरी त्यांना पुढील १० दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग (coronavirus) झाल्यास आपण सरकारी रुग्णालयात उपचार घेऊ, असं देवेंद्र फडणवीस यांनी ३ महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं. त्यानुसार कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात (st george hospital) दाखल झाले होते. त्यांच्यावर डॉ. तात्याराव लहाने आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. 

देवेंद्र फडणवीस यांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत होती. देवेंद्र फडवीस यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही ९३ पर्यंत खाली आली होती. त्यामुळे मागील आठवड्यात त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९७ पर्यंत वाढली. गेल्या रविवारी आणि सोमवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचे डोसही देण्यात आले होते, अशी माहिती सेंट जाॅर्ज रुग्णालयाचे सुप्रीटेंडंट डॉ. आकाश खोब्रागडे यांनी दिली.

डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार देवेंद्र फडणवीस पुढील १० दिवस सागर या शासकीय बंगल्यावर होम क्वारंटाईन असणार आहेत.  

(opposition leader devendra fadnavis discharged from st george hospital after covid test negative)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा