इंदिरा गांधी...राजीव गांधी..आणि विधिमंडळातला गोंधळ!

 Vidhan Bhavan
इंदिरा गांधी...राजीव गांधी..आणि विधिमंडळातला गोंधळ!

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नववीच्या पुस्तकात देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी अवमानजनक माहिती प्रकाशित केल्याच्या मुद्यावरून बुधवारी विधानसभेत जोरदार गोंधळ झाला.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती.


इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोन्ही नेत्यांचे देशाप्रती मोठे योगदान आहे. त्यांनी देशासाठी प्राणांचे बलिदान दिले. इतिहासाच्या पुस्तकातील या दोन्ही नेत्यांबाबत केलेले उल्लेख जाणीवपूर्वक प्रतीमा मलीन करण्याच्या हेतूने केल्याचे दिसून येते. संबंधित पुस्तकातून सदरहू परिच्छेद वगळावेत.

राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा


इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे योगदान सगळ्यांना माहिती आहे. इंदिरांजीकडे पोलादी स्त्री म्हणून पाहिले जाते. त्यामुळे या लेखनाने देशातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. आमच्या सरकारच्या काळातही काही आवमानकारक लेखन मागे घेतले आहे. त्यामुळे हे लेखन मागे घेण्याचा निर्णय घ्या.

अजित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस


सरकारने ते पुस्तक छापले नाहीत. शिक्षण मंडळाला स्वायत्तता आहे. त्यांना आपल्या भावना कळवण्यात येणार आहेत. सरकार याबाबत कार्यवाही करेल. यावर शालेय शिक्षण मंत्री निवेदन करतील. निवेदन येईपर्यंत थांबा.

गिरीष बापट, संसदीय कार्यमंत्री


तरी विरोधक आक्रमक

बापट यांच्या निवेदनानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. विरोधक वेलमध्ये उतरले होते. नही चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नही चलेगी, जब तक सूरज चाँद रहेगा, इंदिरा तेरा नाम रहेगा, अशा घोषणा देत विरोधक वेलमध्ये उतरले होते. मात्र, विरोधकांचा गोंधळ वाढत असल्याचं पाहून पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.हेही वाचा

या आमदारांना कुणी घर देता का घर...

पाटील, तुम्हाला कवितेत रस हाय काय?


Loading Comments