पाटील, तुम्हाला कवितेत रस हाय काय?

 Mumbai
पाटील, तुम्हाला कवितेत रस हाय काय?
Mumbai  -  

हायकू, चारोळी, मुक्त कविता किंवा इतर काही. काव्याचा कोणताही भाग वर्ज्य नसलेले नेते म्हणून केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचं नाव घेतलं जातं. किंबहुना आपल्या शैलीदार कवितांच्या सादरीकरणामुळे आठवले यांनी हा ‘लौकिक’ कमावला आहे. आता रामदास आठवले यांना कवितेच्या बाबतीत टक्कर द्यायला राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील सज्ज होत आहेत. विधानसभेत आपली स्वलिखित कविता सादर करून पाटील यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू दाखवला. जयंत पाटीलयांना कवितारचनेसाठी प्रेरित केलं, गेले काही महिने सोशल मीडियावर धुडगूस घालणाऱ्या सोनू तुला मायावर भरोसा नाय काय... या धम्माल गाण्याने.


कविमनाचे पाटील

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी मुंबई तसंच इतर महानगरपालिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर विरोधकांनी प्रस्ताव दाखल केला. नियम 293 अन्वये दाखल झालेल्या या प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी विनोदाचा बाज पकडला. आधीच असंख्य पद्धतीने विडंबन झालेल्या सोनू तुझा... चं आणखी एक विडंबन जयंत पाटील यांनी सादर केलं.

शिवसेनेच्या आधी गरम आणि नंतर नरम भूमिकेवर जयंत पाटील यांनी उपहासात्मक टिप्पणी केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा जयंत पाटील यांच्या मिश्किल तडाख्यातून सुटले नाहीत. विधानसभा सभागृहाने मनमुराद हास्याच्या साथीने कवी जयंत पाटील यांच्या प्रतिभेला दाद दिली.जयंत पाटील यांनी सादर केलेली हीच ती कविता

लाचासत्तेसाठी झोल झोल झोल झोल
जनतेचा वाजतोय ढोल ढोल ढोल ढोल
देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल गोल गोल गोल

सेना तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय

सेनेला दिलंय गाजर गाजर
गाजराचा आकार कसा लांब लांब लांब लांब
देवेंद्र तुझ्या कामास म्हणतोय थांब थांब थांब थांब
सेना तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय

सेनेचा इथं सभेत नखरा नखरा
वाघाचा झालाय बघा बकरा बकरा
देवेंद्र उद्धवशी कधी तरी गोड बोल गोड बोल
सेना तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय
..........
आणि जर असंच आहे तर

देवेंद्र सेनेवर घाव खोल घाव खोल
सत्तेत राहून त्यांचा शून्य रोल शून्य रोल
देवेंद्र काहीतरी खरं बोल खरं बोल
सेना तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय

सेनेचा भांडा आता खोल खोल खोल खोल
आता तरी त्यांची साथ सोड सोड सोड सोड
सत्तेचे नाही काही मोल मोल मोल मोल
देवेंद्र आता तरी खरं बोल खरं बोलडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments