युतीचे सूत जुळले तरच शिवसेनेसोबत आठवले

मुंबई - रामदास आठवलेंचा रिपाइं पक्ष फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीत शिवसेनेला काडीमोड देण्याची शक्यता आहे. जर यंदाच्या पालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना-भाजपाची युती तुटली तर रिपाइं भाजपाशी युती करून ही निवडणूक लढवेल, असं केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री आणि आरपीआयचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिलेल्या 'एक्स्लुझिव्ह' मुलाखतीत स्पष्ट केलंय. रत्नागिरीत होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी ते मुंबईहून निघाले होते. तेव्हा 'मुंबई लाइव्ह'ला केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या रेल्वेप्रवासही पहायला मिळाला आणि नोटबंदी आणि त्यानंतर राजकारण्यांजवळ मिळणाऱ्या नोटांच्या बंडलांबद्दलचं त्यांचं मत जाणून घेण्याची संधीही.

Loading Comments