Advertisement

मोपलवार प्रकरणावरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक


मोपलवार प्रकरणावरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक
SHARES

समृद्धी महामार्गाचे मुख्य अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या संभाषणाची क्लिप नुकतीच व्हायरल झाली होती. यावरून बुधवारी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.


दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक

या प्रकणावरून दोन्ही सभागृहात विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोपलवार यांचे तातडीने निलंबन करा, अन्यथा सभागृह चालू देणार नाही, असा इशाराच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिला.


दाल में कुछ काला है !

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सांगत वृत्तवाहिनीवर बातमी दाखवण्यात आल्यानंतरदेखील मोपलवारांना कुणी काही विचारले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दोन महिने चौकशीला लागतील. तोवर त्यांना कुणीच काही विचारणार नाही का? असे देखील चव्हाण यांनी विचारत मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. समृद्धी महामार्गाच्या जमीन अधिग्रहणावरही प्रश्नचिन्ह आहे. प्रकाश मेहतांवरही काही कारवाई नाही. त्यामुळे 'दाल मे कुछ काला है' असे वाटत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. सरकारने त्या अधिकाऱ्याला बोलवले आहे का? अजून तो अधिकारी त्या पदावर कसा काय बसून आहे? मंत्रालयात पैसे कोणाला दिले जातात? चपराशी किंवा ड्रायव्हरला तर पैसे दिले जात नाही ना?' असे अनेक सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केले.


तर मोपलवार यांना निलंबित करा -

दरम्यान, विधानसभेप्रमाणेच विधान परिषदेतही याचे पडसाद उमटले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परिषदेमध्ये स्थगन प्रस्थाव मांडत मोपलवार यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली.


मोपलवार यांचे संभाषण सगळयांनी ऐकले असेल. 550 कॉल भाषांतरित केले आहेत. हा भ्रष्ट अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहे. याची चौकशी व्हावी. कारण याच आधिकाऱ्याकडे समृद्धी महामार्ग आहे. पावला पावलाला हे सरकार भ्रष्टाचाराला वाचवत आहे. या अडीच ते तीन वर्षांत एकाही प्रकरणाची चौकशी झालेली नाही.

धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद


'त्यावेळी बाबा तुम्ही झोपला होता का?'

राधेश्याम मोपलवारांना सर्व महत्त्वाची पदे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मिळाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. त्यामुळे 'त्यावेळी तुम्ही झोपला होतात का?', असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाणांना केला.

 


हेही वाचा -

मुख्यमंत्री वापरणार चश्मा आणि श्रवणयंत्र?

तोंड बंद ठेवण्यासाठी बिल्डरने दिली 11 कोटींची लाच?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा