खड्ड्यांचं गणित सुटेना !

 Pali Hill
खड्ड्यांचं गणित सुटेना !

मुंबई - खड्डयांवरून गुरुवारी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाला. काँग्रेस, मनसे आणि सपाने खड्डे का बुजवले जात नाहीत. एकाचा बळी गेल्यानंतरही पालिका जागी का होत नाही. पालिका आयुक्तांनी याचे उत्तर द्यावे. एक तर पालिका आयुक्तांना बोलवा नाही तर आम्हाला आयुक्तांकडे घेऊन चला असे म्हणत स्थायी समितीत चांगलाच राडा घातला. प्रशासनाने यानंतरही समाधान उत्तर न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर सत्ताधारी भाजपानेही यात उडी घेत सभात्याग केला.

कधी मुंबईत केवळ 35 तर कधी केवळ 39 खड्डे असल्याचे सांगत महानगरपालिका मुंबईकरांची दिशाभूल करत आहे. मुंबईत 35, 39 नव्हे तर हजारो खड्डे असल्याचे वेळोवेळी विरोधकांकडून दाखवले आहे. तरी प्रशासनाचे डोळे उघडलेले नाहीत. असा आरोप विरोधकांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पालिका आयुक्तांना एका पत्राद्वारे पंधरा दिवसात खड्डे बुजवून रस्ते चकाचक करण्याचे आदेश दिले आहेत. यावरूनही विरोधकांनी भाजप-सेनेला चांगलेच धारेवर धरले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. तर पालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी 5 आक्टोबरपर्यंत मुंबईतील सर्व खड्डे बुजवले जातील असे आश्वासन स्थायी समितीत दिले. मात्र या आश्वसनाने, आयुक्तांच्या उत्तराने विरोधक समाधानी झाले नाहीत. पालिका प्रशासन खोटे बोलत असून वेळ मारून नेत असल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला आहे.

Loading Comments