सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती

 Nariman Point
सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती

नरीमन पॉईंट - सोमवारपासून सुरु होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी विधानपरिषद विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी विरोधी पक्ष नेत्यांची बैठक झाली. या वेळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेत कोणकोणत्या मुद्द्यावरून घेरता येईल यावर चर्चा झाली.

या बैठकीत काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान परिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे, आमदार संजय दत्त, भाई जगताप, राष्ट्रवादी पक्षाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, शरद रणपिसे, शेकापचे जयंत पाटील, गणपतराव देशमुख, जनता दल सेक्युलरचे कपिल पाटील उपस्थित होते.

Loading Comments