'हमारा प्रधानमंत्री रिश्वतखोर है'

 Pali Hill
'हमारा प्रधानमंत्री रिश्वतखोर है'
'हमारा प्रधानमंत्री रिश्वतखोर है'
See all

सीएसटी - काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांनी 'हमारा प्रधानमंत्री रिश्वतखोर है' असं हातावर गोंदवून गुरूवारी अनोखं आंदोलन केलं.

"काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात गुजरातमधल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लाचखोरीचा आरोप केला होता. मोदी यांनी सहारा आणि बिर्ला समूहाकडून 2013 मध्ये सहा महिन्यात नऊ वेळा लाच घेतल्याचे पुरावे राहुल गांधींनी सादर केले होते. आयकर विभागाकडेही याचे सर्व पुरावे आहेत. तरीही मोदी यांच्यावर कारवाई झालेली नाही. यावरून सिद्ध होते की नरेंद्र मोदी हे लाचखोर आणि रिश्वतखोर आहेत. त्यामुळेच हे आंदोलन केलं," असं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं.

"6 जानेवारी 2016 ला नोटाबंदी विरोधात मुंबईत उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयाला काँग्रेस घेराव घालणार आहे," अशी माहिती निरुपम यांनी दिली. ‘नरेंद्र मोदी 24 डिसेंबरला शिवस्मारकाच्या जलपुजनासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी मुंबई काँग्रेसतर्फे मोदींना काही प्रश्न विचारणार होतो. पण आम्हाला ते विचारू दिले नाहीत’, " असा आरोपही निरुपम यांनी केला.

Loading Comments