Advertisement

पाकिस्तानची पुन्हा कुरापत, भारतीय वंशाच्या एका नागरिकाला अटक


पाकिस्तानची पुन्हा कुरापत, भारतीय वंशाच्या एका नागरिकाला अटक
SHARES

कुलभूषण जाधव यांच्या फाशीप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात ताेंडघशी पडलेल्या पाकिस्तानच्या कुरापती काही थांबलेल्या नाहीत. भारतीय वशांच्या नागरिकाला अटक करून पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताची खोडी काढली आहे. गुलाम शेख नबी अहमद (40) असे अटक करण्यात आलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकाचे नाव आहे.

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामाबादमध्ये भारतीय वंशाचे नागरिक गुलाम शेख नबी अहमद फ/८ चौफ, निजामुद्दीन रोड येथून चालत होते. त्यांचा पेहराव आणि दिसण्यावरून ते भारताच्या सूरतमधील असावेत, अशी शंका पोलिसांना आली. त्यांनी अहमद यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्यावर त्यांच्याकडील कागदपत्रे अर्धवट होती. त्यामुळे त्यांना 19 मार्च रोजी दुपारी 2 वाजता आर्टिकल ऑफ फॉरेन अॅक्ट 7,4,5,6 अंतर्गत अरशूल पोलीस ठाण्यात त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुलाम शेख नबी हे जोगेश्वरी पूर्वेकडील तबस्सूम हॉटेलजवळ खोली क्रमांक 755 येथे रहात होते. त्यानंतर ते जोगेश्वरीतील वैशाली नगर येथे रहायला गेले. पण ते पाकिस्तानात कधी गेले आणि कशासाठी गेले याची माहिती मिळू शकलेली नाही. जाधव प्रकरणापाठोपाठ आता गुलाम शेख यांच्यावरुनही आंतरराष्ट्रीय राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा