होय, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचं प्लानिंग पाकिस्तानमध्ये झालं, पाकिस्तानी पंतप्रधानांनी केलं कबूल

मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना आम्हाला कठोर शिक्षा करायची आहे. या खटल्याची स्थिती काय आहे याची माहिती घेण्याची सूचना मी माझ्या सरकारला केली आहे. हा एक दहशतवादी हल्ला हाेता आणि या खटल्याकडे जगाचं लक्ष असल्याने आम्हाला हा खटला लवकरात लवकर मार्गी लावायचा आहे.

SHARE

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्लानिंग पाकिस्तानमध्ये झाल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. एका परदेशी वृत्तपत्राला मुलाखत देताना खान यांनी हे मान्य केलं आहे. एवढंच नाही, तर मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा करणं हेच पाकिस्तानच्या हिताचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


कठोर शिक्षा करायचीय

अमेरिकेतील प्रसिद्ध वाॅशिंग्टन पोस्ट या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले की, ''मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना आम्हाला कठोर शिक्षा करायची आहे. या खटल्याची स्थिती काय आहे याची माहिती घेण्याची सूचना मी माझ्या सरकारला केली आहे. हा एक दहशतवादी हल्ला हाेता आणि या खटल्याकडे जगाचं लक्ष असल्याने आम्हाला हा खटला लवकरात लवकर मार्गी लावायचा आहे.''


भाजपावर निशाणा

इम्रान खान केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हणाले की, ''भारतातील सध्याचं सरकार हे मुस्लिमविरोधी सरकार आहे. मी जेव्हा जेव्हा भारत-पाकिस्तान चर्चेचा प्रस्ताव भारतापुढे ठेवला तेव्हा तेव्हा या सरकारने माझा प्रस्ताव फेटाळून लावला. भारतात होणाऱ्या निवडणुकीनंतर आम्ही पुन्हा चर्चेसाठी प्रयत्न करू अशी आम्हाला अपेक्षा आहे.''हेही वाचा-

वाढत्या लोकप्रियतेमुळेच माझ्यावर हल्ला - रामदास अाठवले

खूशखबर! सोमवारपासून मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या