Advertisement

वाढत्या लोकप्रियतेमुळेच माझ्यावर हल्ला - रामदास अाठवले

‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या वतीने शनिवारी अंबरनाथ येथील नेताजी मैदानावर संविधान गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आठवले उपस्थित होते. रात्री १० वाजता हा कार्यक्रम संपल्यानंतर ते व्यासपीठावरून खाली येत असताना प्रवीण गोसावी या तरुणाने त्यांना मारहाण केली.

वाढत्या लोकप्रियतेमुळेच माझ्यावर हल्ला - रामदास अाठवले
SHARES

मी केंद्रीय मंत्री अाहे. त्यामुळे माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे माझ्यावर हल्ला करण्यात अाला असावा अशी शक्यता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली अाहे. तर पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे अाणि घटनास्थळी पुरेशी सुरक्षा न ठेवल्याने हा हल्ला झाला, असा अारोपही अाठवले यांनी केला अाहे. अाठवले यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रिपाइं कार्यकर्त्यानी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तर अंबरनाथ अाणि वांद्रेमध्ये रविवारी सकाळपासूनच कडकडीत बंद पुकारण्यात अाला अाहे. 


नेमकं प्रकरण काय?

‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या वतीने शनिवारी अंबरनाथ येथील नेताजी मैदानावर संविधान गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आठवले उपस्थित होते. रात्री १० वाजता हा कार्यक्रम संपल्यानंतर ते व्यासपीठावरून खाली येत असताना प्रवीण गोसावी या तरुणाने त्यांना मारहाण केली. पोलिसांनी पुरेशी सुरक्षा न दिल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप करून याबाबत लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी अाठवले यांनी केली अाहे.


वांद्रे, अंबरनाथ बंद

रामदास आठवले यांना धक्काबुक्की झाल्याच्या निषेधार्थ रिपाइंने महाराष्ट्र बंदची हाक दिली असून वांद्र्यामध्ये रिपाइंच्या कार्यकरत्यांनी सकाळपासून बंद पुकारला आहे. वांद्रे परिसर बंद असल्यामुळे याठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसंच अंबरनाथमध्येही कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आहे.दुकानांसह रिक्षाही बंद असल्याने स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन अाठवले यांनी केलं अाहे. हेही वाचा - 

मंदिर, पुतळा उभारल्याशिवाय मतं मिळणार नाहीत- आठवले
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा