Advertisement

पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचे राजीनामे नाकारले

बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. दिल्लीतून थेट मुंबईत आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी या नाराज कार्यकर्त्यांशी मंगळवारी संवाद साधत त्यांचे राजीनामे नाकारले.

पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचे राजीनामे नाकारले
SHARES

मुंडे भगिनींना मंत्रिपद न दिल्याच्या नाराजीतून बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. दिल्लीतून थेट मुंबईत आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी या नाराज कार्यकर्त्यांशी मंगळवारी संवाद साधत त्यांचे राजीनामे नाकारले.

खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रात मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं मुंडेंच्या नाराज समर्थकांनी राजीनामासत्र सुरू केलं होतं. या नाराजीनाट्यानंतर पंकजा मुंडे या दिल्लीला रवाना झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व जे. पी. नड्डा यांची भेट घेत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. त्यानंतर दिल्लीवरून मुंबईत परतताच भेटीसाठी दाखल झालेल्या समर्थकाशी संवाद साधला. 

हेही वाचा- पंकजा मुंडेंनी मुंबईत बोलावली नाराज समर्थकांची बैठक

मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं. तळागाळातील माणूस सर्व ठिकाणी पोहोचला पाहिजे हे मुंडे साहेबांना वाटत होते. मुंडे साहेबांनी संघर्ष यात्रा भाजपचा (bjp) मुख्यमंत्री महाराष्ट्रात बसावा म्हणून काढली होती. केंद्रात मंत्रिपद मिळावं म्हणून काढली नव्हती. मला पदाची व सत्तेची लालसा नाही. मला मंत्री करा, माझ्या बहिणीला मंत्री करा यासाठी मी राजकारणात आलेली नाही.

निवडणुकीत मी हरले असले तरी मी संपले नाही. संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते. मला प्रवास खडतर दिसतोय, मागेही होता आणि पुढेही खडतरच दिसतोय. पण अविचाराने निर्णय घ्यायचे नसतात. केंद्रीय मंत्रीपद मिळालं नसलं तरी मी पक्षाची राष्ट्रीय मंत्री आहे, असं म्हणत कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे नाकारत असल्याचंही पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी स्पष्ट केलं.

मुंडे समर्थक बीडमधील ७७, अहमदनगर २५-३० भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. बीडमधील तर सर्वच ११ तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. यातच पाथर्डी तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून लोकनेते गोपीनाथ मुंडे पाथर्डी तालुका विकास आघाडी स्थापन करूया असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

(pankaja munde denied resignation of bjp party workers)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा