• आम्हाला नको प्रस्थापित उमेदवार !
SHARE

विक्रोळी - मुंबईत पालिका निवडणुकीचं वातावरण रंगू लागल्यानं सर्व पक्षातील इच्छुक उमेदवार कामाला लागलेत. मात्र विक्रोळीमधील पार्क साईट येथील रहिवाशांनी अपक्ष उमेदवाराला मदत करण्याचा निर्णय घेतलाय. नुसती मदतच नाही तर हे रहिवासी या उमेदवारांना आर्थिक मदत देखील करतायेत. प्रभाग क्रमांक 123 आणि 124 मध्ये आपल्यातीलच दोघांना अपक्ष म्हणून निवडून आणण्याचा या रहिवाशांनी जणू काही चंगच बांधलाय.

स्थानिक नगरसेवकांनी या प्रभागात पाच वर्ष दुर्लक्ष केल्याने स्थानिक संतप्त झालेत. आणि त्यांनी आता समस्यांची जाण असलेल्या सुनिता जाधव आणि ललिता तांबे यांना मदतीचा हात देऊ केलाय.

अनेक वर्षांपासून अनेक समस्यांचा सामना करावा लागल्याने इथल्या स्थानिकांनी या दोन प्रभागांत 'मिशन 2017' चा निर्णय घेतला. त्यामुळे मतदार राजा आता स्वत: पुढे येवून काम न करणाऱ्या नगरसेवकांना घरी बसवण्याच्या तयारीत आहे हे यावरून दिसून आलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या