Advertisement

प्रभाग 154ला उमेदवारच मिळेना


प्रभाग 154ला उमेदवारच मिळेना
SHARES

चेंबूर - पालिकेच्या एम पश्चिम विभागात येणाऱ्या प्रभाग क्रमांक 154 मध्ये सर्वच पक्ष बाहेरील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहेत. राष्ट्रवादीकडून या ठिकाणी विजय भोसले यांच्या नावाची घोषणा झाली असून केवळ त्यांनीच निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. तर, भाजपाकडून सध्या या प्रभागात नगरसेवक असलेल्या महादेव शिगवण यांना उमेदवारी नाकारण्यात आली असून जिल्हा अध्यक्ष अनिल ठाकूर या प्रभागामधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र, ते देखील प्रभाग क्रमांक 153 चे रहिवासी आहेत. तर, शिवसेनेकडून विविध प्रभागामधून 3 ते 4 जण इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून देखील 2 उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे. हे दोन्ही उमेदवार देखील दुसऱ्या प्रभागातील असल्याने या प्रभागामधून कोणाची लॉटरी लागणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा