Advertisement

बापट उवाच! रामदेवबाबा ऋषितुल्य, देवतुल्य अन् राष्ट्रपुरुष.!!

''तुम्ही बाबा रामदेव यांची टिंगल टवाळी करता, परंतु ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगगुरू आहेत. त्यांनी योगाला जागतिक स्तरावर स्थान मिळवून दिलं. ते ऋषितुल्य, देवतुल्य आणि राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करणे योग्य '' नसल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी म्हणताचं विरोधीपक्षातील आमदार बसल्या जागी उडाले.

बापट उवाच! रामदेवबाबा ऋषितुल्य, देवतुल्य अन् राष्ट्रपुरुष.!!
SHARES
Advertisement

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गुरूवारी एक आगळंवेगळ वाकयुद्ध रंगलेलं सर्वांना पाहायला. योगगुरू आणि पतंजलीचे ब्रँड अॅम्बेसेडर रामदेव बाबा यांच्यावर विरोधकांनी केलेली टीका भाजपा आमदारांच्या एवढी जिव्हारी लागली की त्यांनी थेट रामदेव बाबाला राष्ट्रपुरूषाचीच उपाधी देऊन टाकली.


जमीन देताना सवलत कशी?

त्याचं झालं असं की काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे राज्य सरकार बाबा रामदेव यांच्या संस्थांना जमीन देताना खूप सवलती देत असल्याच्या आरोप केला.आश्चर्यचा धक्का

त्यावर ''तुम्ही बाबा रामदेव यांची टिंगल टवाळी करता, परंतु ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगगुरू आहेत. त्यांनी योगाला जागतिक स्तरावर स्थान मिळवून दिलं. ते ऋषितुल्य, देवतुल्य आणि राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करणे योग्य '' नसल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी म्हणताचं विरोधीपक्षातील आमदार बसल्या जागी उडाले.


महापुरूषांचा अवमान

एखाद्या भोंदू बाबाला राष्ट्रपुरुष कसं म्हणता? असा आक्षेप घेत विरोधकांनी सभागृहात सरकार विरोधात घोषणाबाजी केली. रामदेव बाबा यांना जर राष्ट्रपुरुष म्हणत असाल, तर आपल्या सभागृहात ज्या महापुरुषांची छायाचित्रं लावण्यात आली आहेत, त्या सर्वांचा हा घोर अवमान असल्याचं संजय दत्त म्हणाले.

एका भोंदू बाबाला राष्ट्रपुरुष म्हणत असाल तर, या सरकारचा आम्ही धिक्कार करतो, अशा शब्दांत भाई जगताप यांनीही बापट यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

या विषयावर विधान परिषद सभागृहात एकच गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही आमदार वेलमध्ये उतरून एकमेकांविराधात घोषणाबाजी देत असल्याने सभागृह स्थगित करण्यात आलं.हेही वाचा-

'आपले सरकार' की पतंजली वस्तूविक्री केंद्र?

रामदेव बाबांच्या भेटीतून राज ठाकरे कोणता 'योग' जुळवून आणणार?संबंधित विषय
Advertisement