Advertisement

'सोशल मीडियाच्या जोरावर भाजपाला उलथवू'


'सोशल मीडियाच्या जोरावर भाजपाला उलथवू'
SHARES

सोशल मीडियाच्या जोरावर सत्ता मिळवलेल्या भाजपाला याच सोशल मीडियाच्या जोरावर येत्या निवडणुकीत पाडता येऊ शकतं, असा कानमंत्र हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमला दिला. सोशल मीडिया हे खूपच अचूक आणि प्रभावी माध्यम असल्याचं त्यांनी सांगितलं. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलसोबत संवाद साधताना हार्दिक पटेल यांनी आपलं मत मांडलं.


भाजपा सरकारला उलथवून टाकू

सोशल मीडियामुळे एखादा संदेश १५ सेकंदामध्ये २५ लाख लोकांपर्यंत पोहचू शकतो. व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक यांचा योग्य पद्धतीने वापर व्हायला हवा. सोशल मीडियावर एखादी चळवळ किंवा आंदोलन आपण उभं करू शकतो. व्हॉट्सअॅपपेक्षा आता ट्विटर जास्त शक्तिशाली आणि प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडियाच्या जोरावर आपण लोकांमध्ये जागरुकता आणि उठाव करून भाजपा सरकारला उलथवून टाकू शकतो, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.


'बँकांचीच सफाई सुरू आहे'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार होऊ देणार नाही, असं ओरडून सांगत होते, पण विजय मल्ल्या आणि नीरव मोदी देशाचे पैसे खाऊन देशाबाहेर पळून गेले. त्यांना देशात कधी आणणार यावर मोदी एक शब्दही बोलत नाहीत. गंगेची सफाई करणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात बँकांची सफाई सुरू आहे. ही सरकारची मोठी नामुष्की आहे, अशी टीका हार्दिक पटेल यांनी केली.


देशाची लोकशाही धोक्यात

देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. देशात आतंकवाद वाढला आहे. देशातील तरुणांनी यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हायला हवे. हा तरुणांचा देश आहे. अनेक तरुणांनी देश वाचवण्यासाठी समाजकारण आणि राजकारणात आले पाहिजे. भाजपा सरकार तरुणांना पकोडे विकायला शिकवत आहे. मात्र रोजगार द्यायचा विचार करत नाही. शेतकरी आणि दलितांच्या मूलभूत गरजा त्यांच्या प्रश्नांचा विचार करत नाही. म्हणूनच या सरकारविरोधात लोकांना जागरूक केलं पाहिजे असंही ते म्हणाले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा