'पेंग्विन राणीबागेतच राहणार'

  Pali Hill
  'पेंग्विन राणीबागेतच राहणार'
  मुंबई  -  

  मुंबई - बालहट्ट भोवल्याचं म्हणत पेंग्विन मृत्यूप्रकरणी शिवसेनेवर आणि पालिका प्रशासनावर जोरदार टीका होत आहे. तर उर्वरित पेंग्विन परत थंड प्रदेशात पाठवण्याची मागणीही केली जात आहे. शिवसेनेने मात्र पेंग्विन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्धार केला आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांनी पेंग्विन मृत्यूप्रकरणी प्रशासनास वा इतर कुणालाही जबाबदार धरणं चुकीचं आहे, या प्रकरणाचा अहवाल येईपर्यंत धीर धरायला हवा असं म्हटलंय. तर शिवसेनेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी सध्या राणीबागेत असलेले पेंग्विन व्यवस्थित असल्याचं सांगत पेंग्विनला परत पाठवण्याची भाषा होत असली, तरी पेंग्विन राणीबागेतच राहणार, अशी प्रतिक्रिया मुंबई लाईव्हकडे दिलीय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.