Advertisement

गद्दार कोण आहे हे वरळीकर मतदार उत्तर देतील - राहुल शेवाळे

राहुल शेवाळे यांच्यासह शिवसेनेच्या आणखी 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

गद्दार कोण आहे हे वरळीकर मतदार उत्तर देतील - राहुल शेवाळे
SHARES

काँग्रेस-NCPसोबत जाणं गद्दाराची व्याख्या नाही का? गद्दार कोण आहे याचं उत्तर वरळीकर देतील, असी घणाघाती टीका बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

ते म्हणाले, आदित्य ठाकरे भाजप, शिवसेनेच्या मतांमुळे जिंकून आले आहेत. आदित्य ठाकरे यांना हरविण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रयत्न केला, असा आरोप यावेळी केला.

भाजपची साथ सोडून आदित्य ठाकरे राष्ट्रवादी सोबत गेले. गद्दार कोण आहे हे वरळी विधानसभेतील मतदार निवडणुकीत उत्तर देतील.

आदित्य ठाकरे भाजप, शिवसेनेच्या मतांमुळे जिंकून आले आहेत. उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर आनंदच आहे, पण नरेंद्र मोदी यांच्यासमोर दुसरा सक्षम पर्याय सध्या तरी दिसत नाही, असे राहुल शेवाळे म्हणाले.

विनायक राऊत यांचे आरोप चुकीचे आहेत. लोकसभा अध्यक्षांनी कायदेशीर पद्धतीनं माझी गटनेते पदावर नियुक्ती केली आहे. शिवसेना खासदारांनी शिवसेनेच्या कार्यालयात बैठक घेऊन निर्णय घेतला.

विनायक राऊत आमचे नेते अन्याय करत होते. विनायक राऊत आणि सावंत यांनी इतर खासदारांना बोलण्याची संधी मिळायची नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

मुंबईविषयीही विनायक राऊतच बोलायचे. अडीच वर्ष झाले खासदारांमध्ये नाराजी होती. चीफ व्हिप भावना गवळींनी बैठक बोलावली. त्यांनीच प्रस्ताव मांडला आणि प्रताप जाधव यांनी अनुमोदन दिलं याचं व्हिडिओ शुटींगही झाले आहे.

आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे.
त्यामुळे विनायक राऊत जे बोलतायत त्यात तथ्य नाही, असे शेवाळे म्हणाले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा