Advertisement

मुंबई आयआयटीला १ हजार कोटी देणार - पंतप्रधानांची घोषणा


मुंबई आयआयटीला १ हजार कोटी देणार - पंतप्रधानांची घोषणा
SHARES

जगातील टॉप आयआयटी संस्थेमध्ये मुंबईचे नाव असल्याचे कौतुक करत पायाभूत सोयीसुविधांसाठी १ हजार कोटींचं अनुदान दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) ५६ व्या वार्षिक पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करतानी नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. या दीक्षान्त समारंभानंतर येथील पर्यावरणीय विज्ञान व अभियांत्रिकी केंद्र, ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या नव्या इमारतीचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते झाले. 


अायअायटीने दिग्गज विद्यार्थी घडविले

भाषणाच्या सुरुवातीला मोदींनी स्वातंत्र्यसैनिक खुदिराम बोस यांना श्रद्धांजली वाहत त्यांनी मातृभूमीसाठी केलेल्या कर्तव्याची आठवण करून दिली. गेल्या ६० वर्षापासून आयआयटी अहोरात्र कार्यरत असून दिग्गज विद्यार्थी घडविण्यात आयआयटीचा मोठा सहभाग असल्याचे म्हणत विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचं कौतुकही केलं. तसेच आयआयटीमध्ये देशाच्या कानाकोप-यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यासाठी हे विद्यार्थी अहोरात्र मेहनत घेतात. याच विद्यार्थ्यांच्या अधिक सोयीसाठी आयआयटीच्या पायाभूत सोयीसुविधांसाठी केंद्र सरकारच्या वतीनं १ हजार कोटी रुपयांचं अनुदान देणार असल्याचं मोदींनी यावेळी जाहीर केलं. 


स्टार्ट-अपमध्ये भारत दुसरा

भारत देश हा स्टार्ट-अप क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती मोदींनी दिली. येत्या काळात सौरउर्जा आणि बायोइंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे देश अधिक समृद्ध होण्यास मदत होईल, असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, आज सकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मोदींचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर दीक्षांत सोहळ्याला ते रवाना झाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे हेसुद्धा उपस्थित होते.


हेही वाचा -

मोदींचा मातोश्रीवर 'संपर्क फाॅर समर्थन' काॅल

पंतप्रधानांना धमकी देणाऱ्या तरूणाला मुंबईत अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा