Advertisement

रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटं लाइट बंद ठेऊन दिवे, मेणबत्ती लावा - नरेंद्र मोदी

देशातील सर्व १३० कोटी भारतीयांनी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केलं.

रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटं लाइट बंद ठेऊन दिवे, मेणबत्ती लावा - नरेंद्र मोदी
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. शुक्रवारी सकाळी ९ वाजता देशातील जनतेशी संवाद साधतान त्यांनी नागरिकांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिल्याचं म्हटलं. भारतीय दाखवत असलेल्या संयमाचं कौतुकही त्यांनी केलं. तसंच एकत्र येऊन करोनाला हरवूयात असं आवाहनही मोदींनी केलं आहे. याशिवाय, मोदी यांनी भारतीयांकडे ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एक गोष्ट करण्याचं आवाहन केलं. 

देशातील सर्व १३० कोटी भारतीयांनी रविवार ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचं आवाहन केलं. या माध्यमातून आपण करोनामुळं पसरलेला अंध:कार दूर करु, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 'करोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब जनतेला बसला आहे. त्यांना या अंधःकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटं हवी आहेत', असं नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं. 

'५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील सर्व दिवे, लाइट्स बंद करुन घरातील बाल्कनीमध्ये, दारामध्ये एक दिवा लावा किंवा मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा. करोनामुळं पसरलेल्या अंधःकारामध्ये आपल्याला सतत सकारात्मकतेकडं आणि प्रकाशाकडं प्रवास करायचा आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या गरीब जनतेला सकारात्कमतेकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यालाच त्यांना सोबत घेऊन जायचं आहे', असंही मोदी यांनी म्हटलं आहे. 

'आपण एकटे कसे या संकटाला तोंड देऊ असा प्रश्न तुम्हाला घरात बसून पडला असेल तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही एकटे नाहीत. भारतातील १३० कोटी लोकं एकत्र या संकटाचा सामना करत आहेत. तुम्ही एकटे नाहीत हे लक्षात ठेवा' असं मोदी आपल्या भाषणात म्हणालं. आपण सर्वांनी एकत्र येऊन या करोनाच्या अंध:काराला पळवून लावूयात असं सांगत मोदींनी आपलं भाषण संपवलं.



हेही वाचा -

मुंबईतील पंचांच्या आर्थिक मदतीसाठी माजी पंचांचा मदतीचा हात

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन पेट परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा