महापालिका निवडणुकांत भाजपाची मदार 'पीएम'वर

मुंबई - देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा देत भाजपानं लोकसभा आणि महाराष्ट्राची विधानसभा निवडणूकही जिंकली. आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आलीये. नगर पंचायत निवडणुकांतल्या यशामुळे मुंबईही काबीज करण्यासाठी भाजपा सज्ज होणं साहजिकच. या निवडणुकीच्या यशाची जबाबदारी भाजपानं 'पीएम'कडे सोपवली आहे. प्रमोद महाजन यांचा वारसा, स्वतःला सिद्ध करण्याचा संघर्ष, ठाकरे परिवारासोबतचे संबंध, पंतप्रधान होण्याची शक्यता... ‘मुंबई लाइव्ह’च्या अशा अनेक प्रश्नांना 'पीएम' अर्थात खासदार पूनम महाजन यांनी उत्तरं दिली आणि ‘उंगली उठाओ’ मोहीमेचं कौतुकही केलं.

Loading Comments