Advertisement

पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोच्या भूमिपूजनाचा बार?


पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोच्या भूमिपूजनाचा बार?
SHARES

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोसारख्या मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करत मुंबईकर मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात भाजप आहे. पंतप्रधान मोदी 19 नोव्हेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. तेव्हा ते कोल्ड प्ले इव्हेन्टला हजेरी लावणार आहेत. या दौऱ्यातच मेट्रोच्या भूमिपूजनाचा बार उडवण्याची जोरदार तयारी भाजप आणि एमएमआरडीएकडून सुरू असून याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मेट्रो-2 ब डि.एन.नगर-वांद्रे-मानुखर्द आणि मेट्रो-4 वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या दोन मेट्रो मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्याचा घाट सरकार आणि एमएमआरडीएनं घातला आहे. एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. असं असलं तरी एमएमआरडीएकडून मेट्रो भूमिपूजनासाठी आमंत्रण-निमंत्रणाची, जाहिरातीची जोरदार तयारी सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा