Advertisement

शस्त्रसंधी झाली नसती, तर पीओके जन्मालाच आला नसता- अमित शहा

पं. जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीमुळे काश्मीरचा काही भाग पाकिस्तानकडे गेला आहे. भारतीय लष्कर आगेकूच करत असताना नेहरू यांनी हा वाद संयुक्त राष्ट्रात नेला आणि शस्त्रसंधी लागू झाली.

शस्त्रसंधी झाली नसती, तर पीओके जन्मालाच आला नसता- अमित शहा
SHARES

पं. जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीमुळे काश्मीरचा काही भाग पाकिस्तानकडे गेला आहे. भारतीय लष्कर आगेकूच करत असताना नेहरू यांनी हा वाद संयुक्त राष्ट्रात नेला आणि शस्त्रसंधी लागू झाली. शस्त्रसंधी लागू झाली नसती, तर काश्मीरचा भाग पाकिस्तानकडे गेलाच नसता, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला.

काँग्रेसने राजकारण आणलं

मुंबईतील गोरेगावधील नेस्को सभागृहात अमित शहा यांनी 'कलम ३७०'वर व्याख्यान दिलं. कलम ३७० हटवण्यामागे भाजप आणि केंद्र सरकारची भूमिका त्यांनी मांडली. सरकारने कलम ३७० रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राजकारण आणलं, अशी टीका शहा यांनी केली.

जवानांचा नाहक बळी

कलम ३७० मुळे काश्मीरमध्ये दहशतवाद पोसला गेला. ज्यातून ४० हजार जवानांचा बळी गेला. मात्र केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्यापासून काश्मीरमध्ये एकही गोळी झाडण्यात आलेली नाही. काश्मीर यापुढे विकासाच्या वाटेवर वाटचाल करेल, असंही शहा म्हणाले.

निवडणुकीचा मुद्दा 

जम्मू व काश्मीरचा प्रश्न किंवा ३७०वे कलम हा भाजपसाठी राजकारणाचा विषय नसून देशभक्तीचा आहे. देशहिताच्या निर्णयाला समर्थन मिळावं व विधानसभेत जनतेने भाजपला बहुमत द्यावं, असं आवाहन शहा यांनी केलं. राज्यातील प्रत्येक घराघरात जाऊन कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती नागरिकांना द्यावी, अशी सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली.



हेही वाचा-

पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच, अमित शहांच्या वक्तव्यामुळं शिवसेना दबावात..?

Vidhan Sabha Election 2019: शिवसेनेची ११८ जागांवर बोळवण?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा