'सांगली भ्रूण हत्येचे धागेदोरे राज्याबाहेरही'

  Mumbai
  'सांगली भ्रूण हत्येचे धागेदोरे राज्याबाहेरही'
  मुंबई  -  

  मुंबई - सांगलीच्या म्हैसाळमध्ये 19 भ्रूण मृतदेह सापडल्याने सोमवारी अधिवेशनातही हे प्रकरण विरोधी पक्षांनी उचलून धरले. या प्रकरणाबद्दल माहिती देताना आरोग्यमंत्री दीपक सांवत यांनी सांगितले की सध्या आरोपी फरार आहेत. पोलीस आरोपींना पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्राच्या बाहेरही असल्याची माहिती मिळाली असल्याचे दीपक सावंत यांनी सांगितले. त्यामुळे कर्नाटक पोलिसांचीही मदत यासाठी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. हे अत्यंत घृणास्पद प्रकरण आहे. राज्य सरकार मुलींबाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र समाजानेही पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगत लवकरच घटनास्थळी भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.