SHARE

विक्रोळी - विक्रोळी पार्क साईट येथील प्रभाग १२३ चे शिवसेनेचे बंडखोर आणि माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा कार्यकर्ता संदेश दळवी याला मतदारांना पैसे वाटप करताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पार्क पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. संदेश दळवी या व्यक्तीकडे ५० हजार रुपयांची रोकड सापडली आहे. पैसे वाटप होत असल्याचे कळताच डॉ. भारती बावदाणे यांचे पती डॉ. सुबोध बावदाणे यांनी सुधीर मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

'दळवी यांचे प्रिंटिंग प्रेसचे दुकान असून, ही रोकड त्याच्या दुकानाच्या गल्ल्यातील असून डॉ. सुबोध बावदाणे यांनी विनाकारण गोधळ घातला. मुळात यात मतदारांना पैसे वाटप करण्याचा कोणताही प्रकार नव्हता', असा दावा सुधीर मोरे यांनी केला. डॉ. सुबोध बावदाणे आणि १२३ चे उपशाखा प्रमुख सुनील पाटील यांना सुधीर मोरे यांच्या माणसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप प्रभाग १२३च्या शिवसेनेच्या उमेदवार डॉ. भारती बावदाणे यांनी केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या