निवडणुकीसाठी पोलिसांचं पथसंचलन

 Mumbai
निवडणुकीसाठी पोलिसांचं पथसंचलन
निवडणुकीसाठी पोलिसांचं पथसंचलन
निवडणुकीसाठी पोलिसांचं पथसंचलन
See all
Mumbai  -  

गोरेगाव - मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यासाठी आता पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. गोरेगावमध्ये पोलिसांनी पोलीस ताफ्यासह एस. व्ही. रोड पोलीस स्टेशन ते एसव्ही रोड, जवाहर नगर, स्टेशन परिसर, उन्नत नगर, प्रेम नगर या त्यांच्या हद्दीतून पथसंचलन केले. यावेळी पोलिसांनी मतदारांना उद्या निर्भीडपणे तुम्ही घराबाहेर मतदानासाठी पडा, आम्ही आहोत सुरक्षेसाठी हा संदेश दिला. दरम्यान, पोलिसांच्या या पथ संचलनामुळे आम्ही कोणत्याही भीती शिवाय निर्भीडपणे मतदान करू शकतो अशी प्रतिक्रिया गोरेगाव यशवंतनगर येथील नागरिक राजेश गावकर यांनी दिली.

Loading Comments