Advertisement

राजकीय पक्षांच्या कार्यालयावर गदा


राजकीय पक्षांच्या कार्यालयावर गदा
SHARES

नरिमन पॉईंट - मेट्रो फेज 3मुळे राजकीय पक्षांच्या कार्यालयावर गदा आली आहे. या कार्यालयांना आता स्थलांतरीत होण्याची गरज निर्माण झाली आहे. एमएमआरडीएने नरीमन पॉंईंट परिसरातील कार्यालयांना स्थलांतरीत करण्याची नोटीस बजावली आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समाजवादी आदी पक्षांचा समावेश आहे.

अंधेरी सीप्झ ते कुलाबा अशा भुयारी मार्गाने तयार होणाऱ्या मेट्रो ३साठी नरिमन पॉईंट परिसरातील कार्यालये येत्या काही दिवसांसाठी स्थलांतरित करण्यात येणार आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट, पोर्ट हाऊस, शुरजी वल्लभदास मार्ग, बेलार्ड इस्टेट ठाकरसी हाऊस इथं या राजकीय पक्षांच्या कार्यालयांना नव्याने जागा वाटप करण्यात येणार आहे.

"सध्या पक्ष कार्यालय कुठे स्थलांतरित करायची यावर चर्चा सुरू आहे. अदयाप पर्यायी योग्य जागा मिळाली नाही," असं नसल्याचे काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी सांगितले. "आम्हाला पर्यायी जागा देण्यात यावी, आम्ही जागा खाली करण्यास तयार आहोत. मात्र अद्याप जागेचा अंतिम निर्णय झाला नसून चर्चा सुरू आहे," असं राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा