• राजकारण्यांचं डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
  • राजकारण्यांचं डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
SHARE

दादर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी दाखल झाले आहेत. राजकीय नेत्यांनी सुद्धा बाबासाहेबांना वंंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुडे, तसंच शिक्षणमंत्री विनोद तावडे सोबतच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान अर्थतज्ञ्ज्ञ होते. भारतात रुपया या चलनाला भेडसवणारी समस्या आणि त्याच्या उपायाबद्दल त्यांनी 1927 साली लिहून ठेवले होते. देशात आणि राज्यात उदभवणाऱ्या समस्येला संविधानात उत्तर मिळते. अशा महान व्यक्तीला मानवंदना देण्यास आम्ही आलेलो आहोत. इंदू मिलमधील स्मारकाचे कामही सुरु झालेले आहे, लवकरच हे स्मारक पूर्ण होईल, त्यामुळे सर्वांना प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रीया या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या