Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

मुलुंडमध्ये राजकीय वातावरण तापलं


मुलुंडमध्ये राजकीय वातावरण तापलं
SHARES

मुलुंड - पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याचं गुरुवारी जाहीर केलं. त्यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मुलुंडमधील शिवसेना शाखा क्रमांक 105 समोर सेना कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून या निर्णयाचे स्वागत केले.

'भाजपा सोबत पटत नव्हतेच, फक्त आता छुपी लढाई न करता थेट लढाई होईल' असे मत शिवसेना शाखा क्रमांक 105चे शाखाप्रमुख दीपक सावंत यांनी व्यक्त केले. 'भाजपाकडे कार्यकर्त्यांची कमी आहे, प्रचार केला म्हणून ते मागील निवडणुकीत जिंकले', असे वक्तव्य सेनेचे गटप्रमुख चंद्रकांत शेलार यांनी केले. याच दरम्यान भाजपा नगरसेवक मनोज कोटक यांनी 'मागील विधानसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही भाजपा यशस्वी होईल आणि मुलुंडमधील सहाच्या सहा वॉर्डमध्ये भाजपा निवडून येईल' असा विश्वास व्यक्त केला. तर 'ठाकरे कुटुंबियांबद्दल अत्यंत आदर वाटतो, पण वेगळे निवडणूक लढलो तर भाजपा यशस्वी होईल अशी भावना भाजपा आमदार तारासिंग यांनी व्यक्त केली. या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे यंदाची पालिका निवडणूक चांगलीच रंगणार असल्याची चर्चा आहे. आता फक्त मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपले मत देतो हे पहाणं औत्सुक्याचं ठरेल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा