मनसे- भाजपात बॅनर युद्ध

  Dadar
  मनसे- भाजपात बॅनर युद्ध
  मुंबई  -  

  दादर - फेब्रुवारी 2017 च्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे जाहीरातबाजी सुरू झालीय. सेना भाजपमधला वाद कुठेतरी कमी होतो न होतो, तोपर्यंत मनसे भाजप युद्धाला सुरुवात झालेले पहायला मिळत आहे. 22 डिसेंबरच्या रात्री भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन समोर असलेल्या कोहिनूर स्क्वेअर भिंतीवर याधाही असलेली मनसेची जाहीरात पूसुन भाजपची जाहिरात केली. त्यामुळे गुरूवारी रात्री अचानक भिंतीवरील राज ठाकरेंच्या जागी नरेंद्र मोदींचं चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे शुक्रवारी या विभागात मनसे नगरसेवक संतोष धुरी आणि मनसैनिकांनी राडा घातला. हे प्रकरण शांत होताचं गप्प बसतील ते मनसैनिक कसले. हा प्रकार झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसात म्हणजे 27 डिसेंबरला कोहिनूर स्क्वेअरच्या भिंतीवर नगरसेवक संदिप देशपांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष केलं. इंदू मिलमध्ये आंबेडकर स्मारकाचं पूजन करतानाचे नरेंद्र मोदी दाखवून शिवस्मारक बांधताना मोदींना आंबेडकर स्मारकाचा विसर पडलाय का ? मोदी स्मारकाचं पूजन करून ते विसरून जातात, अशा आशयाचे बॅनर लावले. आता या बॅनरमुळे मनसे आणि भाजपाच्या बॅनरबाजीची पुन्हा एकदा जुगलबंदी पहायला मिळणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.