Advertisement

राणेंविरोधात शिवसेनेचे 'पोस्टरवाॅर'


राणेंविरोधात शिवसेनेचे 'पोस्टरवाॅर'
SHARES

काँग्रेसमधून बाहेर पडलेले नारायण राणे यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशामुळे चिथावलेली शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे. याचाच प्रत्यय सोमवारी वरळी नाका येथे आला. शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी राणेंवर अत्यंत खालच्या भाषेत टीका करणारे 'पोस्टर' वरळी नाका परिसरात लावले. या पोस्टरवरून राणे यांचाही चांगलाच तिळपापड झाला. नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी क्षणाचाही विलंब न करता शिवसेनेला आव्हान देत राज्यभर बॅनर लावून अशाच शेलक्या भाषेत प्रतिउत्तर देण्याची गर्जना केली आहे. यावरून राणे आणि शिवसेनेतील जुने वैर पुन्हा एकदा 'पोस्टरवाॅर'च्या रुपात पेटण्याची चिन्हे आहेत.


काय आहे पोस्टरमध्ये ?

'इच्छा माझी पुरी करा' अशा शिर्षकाखाली लावलेल्या या पोस्टरमध्ये नारायण राणे यांच्यावर अत्यंत अर्वाच्च भाषेत टीका करण्यात आली आहे. होर्डिंगमध्ये रेखाटण्यात आलेली चित्रे आणि त्यातील भाषा देखील वादग्रस्त आहे.



नारायण राणे यांचा पराभव होत नाही, तोपर्यंत पायात चपला घालणार नाही, अशी शपथ अरविंद भोसले यांनी घेतली होती. राणेंचा पराभव झाल्यानंतर अरविंद भोसले यांनी पायात चपला घातल्या. मात्र आता पुन्हा राणेंच्या विरोधात बॅनरबाजी करून भोसले चर्चेत आले आहेत.




निलेश राणे आक्रमक

शिवसेनेच्या या बॅनरबाजीवर राणेंचे चिरंजीव आणि माजी खासदार निलेश राणे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी शिवसेनेला त्यांच्या खास शैलीत ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. मुंबई भर आता बॅनर लावून त्याच भाषेत लायकी काढणार. अशा आषयाचे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. त्यामुळे आता या पोस्टर वादावरून शिवसेना विरूद्ध राणे असा सामना पाहायला मिळणार हे नक्की.



हेही वाचा -

मुंबईतील राणे समर्थक नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात

 'ही' आहे राणेंच्या राजीनाम्यामागील राजकीय खेळी!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा