Advertisement

आंदोलन करू द्या नाहीतर, मंत्रालयात घुसू - बच्चू कडू


आंदोलन करू द्या नाहीतर, मंत्रालयात घुसू - बच्चू कडू
SHARES

दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मनोरा आमदार निवासाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यास पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. तर आंदोलन करू द्या, नाहीतर मंत्रालयात घुसू अशी भूमिका आ. कडू यांनी घेतल्याने आमदार निवासाबाहेरील वातावरण चांगलंच तापलं होतं.




दिव्यांग्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेतर्फे सोमवारी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार मनोरा आमदार निवासाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं. परंतु पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना बसण्यास मनाई केल्याने तणाव निर्माण झाला.


आम्ही गांधीगिरीने आंदोलन करणार आहोत, त्यामुळे अाम्हाला आंदोलन करू द्या, आमच्या मागण्यांची सरकार कशी दखल घेते ते पाहू. आम्हाला त्रास दिला तर आम्ही मंत्रालयात घुसू.
- आ. बच्चू कडू




कुठल्या मागण्यांसाठी आंदोलन?

- राज्यातील दिव्यांगांना देण्यात येणारे संजय गांधी निराधार योजनेचे मानधन ६०० रुपयांवरून १५०० रुपये करण्यात यावं.

- एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक दिव्यांगांना समप्रमाणात मानधन वितरित करावं

- सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत यांनी शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांगाचा ५ टक्के निधी तातडीने खर्च करणे, निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सेवा हमी कायदा व दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई करणे



हेही वाचा-

काँग्रेसच्या सचिवपदावरून प्रिया दत्त यांची उचलबांगडी

धक्कादायक! संभाजी भिडे यांना सरकारचं अभय, ६ गुन्हे घेतले मागे


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा