Advertisement

काँग्रेसच्या सचिवपदावरून प्रिया दत्त यांची उचलबांगडी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी प्रिया दत्त यांना २६ सप्टेंबर रोजी एक पत्र पाठवून त्यांना सचिवपदावरून दूर करण्यात येत असल्याचं कळवलं. सोबतच गेहलोत यांनी पाठवलेल्या या पत्रामध्ये सचिव म्हणून दत्त यांनी केलेल्या कार्याचीही प्रशंसा करण्यात आली असून भविष्यात त्यांची पक्षाला गरज भासणार असल्याचं नमूद केलं आहे.

काँग्रेसच्या सचिवपदावरून प्रिया दत्त यांची उचलबांगडी
SHARES

माजी खासदार आणि काँग्रेसच्या सचिव प्रिया दत्त यांची अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सचिवपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली. मुंबई काँग्रेसमधील गटबाजी आता उघडपणे समोर येत असून या गटबाजीतूनच प्रिया दत्त यांचा पत्ता साफ करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.


काय आहे पत्रात?

गेहलोत यांनी प्रिया दत्त यांना २६ सप्टेंबर रोजी एक पत्र पाठवून त्यांना सचिवपदावरून दूर करण्यात येत असल्याचं कळवलं. सोबतच गेहलोत यांनी पाठवलेल्या या पत्रामध्ये सचिव म्हणून दत्त यांनी केलेल्या कार्याचीही प्रशंसा करण्यात आली असून भविष्यात त्यांची पक्षाला गरज भासणार असल्याचं नमूद केलं आहे.


निरूपम यांच्या निकटवर्तीय

प्रिया दत्त काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या निकटवर्तीय असल्याचं म्हटलं जातं. निरूपम यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी माजी खासदार दिवंगत गुरूदास कामत आणि मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. असं असलं तरी प्रिया दत्त यांनी याप्रकरणी आपली भूमिका उघडपणे सांगितली नव्हती.


मग कारण काय?

निरूपम यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी उत्तर मध्य मतदारसंघात एक बैठक झाली. या बैठकीत निरूपम यांनी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील लोकसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून दत्त यांच्या नावाची घोषणा केली. दत्त यांच्या नावाची घोषणा होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. २०१४ पासून दत्त या मतदारसंघात फिरकलेल्या नसताना त्यांच्या नावाची परस्पर घोषणा कशी केली, असा प्रश्न उपस्थित करत निरूपम यांना घेराव घातला.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यालयातून निघालेल्या आदेशानुसार दत्त यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आल्याचं समजत आहे. प्रिया दत्त या काँग्रेसचे माजी खासदार आणि अभिनेते दिवंगत सुनील दत्त यांच्या कन्या आहेत.



हेही वाचा-

धक्कादायक! संभाजी भिडे यांना सरकारचं अभय, ६ गुन्हे घेतले मागे

राफेल करार बोफोर्सचा बाप - संजय राऊत



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा