Advertisement

राफेल करार बोफोर्सचा बाप - संजय राऊत


राफेल करार बोफोर्सचा बाप - संजय राऊत
SHARES

भाजप सरकारच्या राफेल करारावरून देशासह राज्यात विरोधकांनी रान पेटवलं आहे. यवरून आता शिवसेनेनंही मोदी सरकारवर कडवी टीका केली असून या कराराची तुलना थेट बोफोर्स घोटाळ्याशी केली आहे. राफेल डील हे बोफोर्स घोटाळ्याचा बाप असल्याची खोटक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून राऊत यांनी भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे.


बोफोर्स घोटाळ्याचा बाप

काँग्रेस सत्तेत असताना बोफोर्स घोटाळ्यामध्ये काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नातेवाईकांना ६५ कोटी रुपयांची दलाली मिळाल्याचा आरोप करणारे आता सत्तेत आहेत. त्यांच्या राफेल जेट विमानांच्या व्यवहारात ७०० कोटी रुपये कुणाच्या खिशात गेले आहेत? त्यामुळे राफेल डील तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप आहे. राफेल डीलवरुन फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारनेच रिलायन्सचे नाव सूचवल्याचं उघड केल्यानतंर आता हे ओलांद राहुल गांधींचे हस्तक किंवा देशद्रोही आहेत असं मानायचे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.


हा कसला सौदा?

रिलायन्सच्या अनिल अंबानी यांना या विमानांचं कंत्राट दिलं हा प्रश्नच नाही. तर ५२६ कोटींचा खरेदी व्यवहार मोदी सरकारच्या काळात १५७० कोटींवर गेलाच कसा? याचं स्पष्टीकरण सरकारने द्यायला हवं? म्हणजेच मधल्या व्यक्तीला यामध्ये प्रत्येक विमानामागे १००० कोटी रुपयांची दलाली मिळाली आहे, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

'हा कसला सौदा आहे. भ्रष्टाचाराच्या पैशांमधून देशात निवडणुका लढवल्या जात आहेत. सरकार बनत आहेत. निवडणुकांसाठी बोफोर्स आणि राफेलसारख्या व्यवहारांमधून पैसा उभा केला जातो, हे देशाचं दुर्देव असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.


पाकिस्तानला मदत

राहुल गांधी राफेलबाबत स्पष्टीकरण मागत आहेत. त्यावरुन राहुल गांधी पाकिस्तानला मदत करत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. यापूर्वी 1980 मध्ये असाच आरोप बोफोर्स प्रकरणात भाजपने केला होता. त्यामुळे भाजपच आता पाकिस्तानला मदत करत नाहीत का? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. त्यामुळे याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी लकवकर स्पष्टीकरण देतील, अशी अशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा