जखमी संदीपला शिवेसेनेची मदत

 Dahisar
जखमी संदीपला शिवेसेनेची मदत

दहिसर - दहिसर पूर्व केतकीपाडा इथं गणपती विसर्जनदरम्यान संदीप उत्तेकर हा तरूण जखमी झाला होता. त्याला शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी आर्थिक मदत केली आहे. प्रकाश सुर्वे यांनी 15 हजार रूपये रक्कम संदीप उत्तेकरच्या पत्नीकडे सुपूर्द केली. सिध्दीविनायक चॅरिटेबल ट्रस्टकडेही प्रकाश सुर्वे यांनी मदतीची याचना केली आहे. संदीपवर मीरारोडच्या ऑर्बिट हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. संदीपवर होणाऱ्या उपचाराचा खर्च 15 लाख रूपये येणार आहे. शुक्रवारी त्याला उपचारासाठी नायर रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

Loading Comments