Advertisement

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी?

पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी?
SHARES

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार सोमवारी झाला. यामध्ये काँग्रेसच्या १० आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रीपद न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना का वगळलं याचीच आता चर्चा होत आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपद दिलं नसल्याचं बोललं जात आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे दोन्ही माजी मुख्यमंत्री मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी आग्रही होते. मात्र, काँग्रेसच्या वाट्याला मोजकीच खाती आल्यामुळे दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचा सहभाग अशक्य असल्याचीही चर्चा होती. मात्र, अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मंत्री बनल्याने प्रदेशाध्यक्षपदासाठी वेगवेगळ्या नावाची चाचपणी सुरू होती. राज्यात पक्षाला उभारी देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडं  प्रदेशाध्यक्षपद देण्यावर काँग्रेस हायकमांडने शिक्कामोर्तब केल्याचे समजतं.  पृथ्वीराज चव्हाण हे गांधी कुटुंबीयांचे जवळचे समजले जातात. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसबाबतचे धोरण ठरवण्यात फारशी अडचण येणार नाही असं काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना वाटत आहे. काही वर्षांपूर्वी राज्यात पहिल्या क्रमांकावर असणाी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची चर्चा आहे. 



हेही वाचा  -




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा