Advertisement

नव्या वर्षातले मनसेचे पहिले अधिवेशन गोरेगावमध्ये

मनसेने एकूण ११० जागांवर निवडणूक लढवली. पण फक्त एका कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेला यश मिळाले.

नव्या वर्षातले मनसेचे पहिले अधिवेशन गोरेगावमध्ये
SHARES

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये मिळालेल्या अपयशानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. मुंबईत मनसेच पहिले महाअधिवेशन २३ जानेवारी रोजी गोरेगाव नेस्को येथे होणार आहे. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून त्या दिवशी हे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्व तयारीचा आढावा घेणारी मनसे नेत्यांची बैठक, शुक्रवारी मनसेचे मुख्यालय असलेल्या राजगड कार्यालयात पार पडली.

हेही वाचाः- वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही- अमृता फडणवीस

मनसेच्या महाअधिवेशला मोठ्या प्रमाणात राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हे अधिवेशन कसे असावे, अधिवेशनात कोणते मुद्दे चर्चेला असावेत, यासाठी मनसेच्या बैठका सुरू आहेत. त्याच अनुशंगाने शुक्रवारी मनसेच्या पदाधिकाऱयांची बैठक राजगड येथील मुख्यालयात पार पडली. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे आदी महत्वाचे नेते उपस्थित होते. आमचे हे अधिवेशन खूप मोठे असणार आहे. तसेच राज्यभरातील सर्व कार्यकर्ते या अधिवेशनाला येणार असून त्या पार्श्वभूमिवर या बैठका सुरू असल्याची माहिती संदिप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

हेही वाचाः -आदित्य ठाकरे घेणार मंत्रिपदाची शपथ

राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. त्यामुळे मनसेला सक्षम विरोधी पक्ष बनवा अशी मागणी केली होती. पण राज्यातील जनतेने मनसेऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधक म्हणून बळकट बनवले. मनसेने एकूण ११० जागांवर निवडणूक लढवली. पण फक्त एका कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेला यश मिळाले. मनसेचे प्रमोद पाटील या मतदारसंघातून निवडून आले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा