Advertisement

प्रियांका गांधी सक्रिय! काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेसनं मोठे फेरबदल करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून निवडणूकादरम्यान राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या प्रचारात दिसणाऱ्या, मात्र राजकारणात सक्रिय नसलेल्या प्रियांका गांधींची बुधवारी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रियांका गांधी सक्रिय! काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती
SHARES

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेसनं मोठे फेरबदल करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून निवडणूकादरम्यान राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या प्रचारात दिसणाऱ्या, मात्र राजकारणात सक्रिय नसलेल्या प्रियांका गांधींची बुधवारी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रियांका गांधीही राजकारणात सक्रिय होणार असून काँग्रेसला आणखी एक नवा चेहरा प्रियांका यांच्या निमित्तानं मिळाला आहे. दरम्यान प्रियंका राजकारणात सक्रिय होणार असल्याची बातमी समजताच कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र दुसरीकडे ऐन  निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं खेळलेली ही मोठी खेळी मानली जात आहे.


प्रियांका लाओ, काँग्रेस बचाओ

अनेक वर्षापासून प्रियांका गांधी यांना राजकारणात सक्रिय करावं, अशी मागणी काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांची होती. पण प्रियांका काही राजकारणात सक्रिय झाल्या नाहीत. मात्र निवडणुकादरम्यान राहुल गांधी आणि सोनिया गांधीच्या प्रचारात त्या नेहमीच पुढे असायच्या. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रियांका गांधींना राजकारणात सक्रिय करण्याच्या मागणीनं पुन्हा एकदा वेग धरला. त्यामुळे मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी याआधीच बॅनर लावत प्रियांका गांधींना राजकारणात आणण्याची तसंच भोपाळमधून निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची मागणी उचलून धरली होती. प्रियांका लाओ, काँग्रेस बचाओ असे पोस्टर अनेक ठिकाणी झळकत होते.


कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

अखेर कार्यकर्त्यांची ही भावना आणि लोकसभा निवडणुकांचं आव्हान लक्षात घेता काँग्रेसनं प्रियांका गांधींना सरचिटणीस पद बहाल केलं आहे. त्यामुळे आता राहुल गांधी, सोनिया गांधीसह प्रियांका गांधीही राजकारणात सक्रिय होणार असल्यानं अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साह संचारला आहे. दरम्यान भाजपानं प्रियांका गांधी यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस हा एका कुटुंबाचा पक्ष असून राहुल गांधी अपयशी ठरल्यानं प्रियंका गांधींना आणावं लागल्याचं म्हणत भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 



हेही  वाचा -

महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सीसीटीव्हीचं जाळं आता आणखी मजबूत

३३ हजार रुद्राक्षांनी साकारली बाळासाहेबांची प्रतिमा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा