Advertisement

प्रताप सरनाईक यांना २८ जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण

टिटवाळा येथे एका जमिनीच्या गैरव्यवहाराचा आणि नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड मध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप सरनाईक यांच्यावर आहे.

प्रताप सरनाईक यांना २८ जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण
SHARES

मनी लॉँड्रींगसह अन्य प्रकरणांमध्ये ईडीकडून चौकशी सुरु असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे.  सरनाईक यांच्यासह त्यांची दोन मुले आणि निकटवर्तीय योगेश चंडेला यांच्यावर कोणतीही २८ जुलैपर्यंत कारवाई करु नये असे आदेश दिले उच्च न्यायालयाने ईडीला दिले आहेत. यामुळे सरनाईक व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टिटवाळा येथे एका जमिनीच्या गैरव्यवहाराचा आणि नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड मध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप सरनाईक यांच्यावर आहे. सरनाईक यांचे दोन्ही मुले विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक आणि सरनाईक यांचे जवळचे मानले जाणारे योगेश चंडेला यांच्यावरही याच प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप आहेत. याप्रकरणी ईडीने या चौघांना समन्स बजावलं होतं. 

ईडीच्या या कारवाईविरोधात चौघांनीही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच संदर्भातील आणखी एक प्रकरण प्रलंबित असल्याने ईडीने कारवाई करु नये अशी मागणी या याचिकेद्वारे न्यायालयाकडं करण्यात आली होती. 

या याचिकेवर आज न्या.संभाजी शिंदे आणि न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आधीच्या एका प्रकरणात सरनाईक यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. आता त्या प्रकरणाची नव्या प्रकरणांसोबत एकत्रित सुनावणी घेण्याचे खंडपीठाने निश्‍चित केले आहे. त्यामुळे आमदार प्रताप सरनाईकांवर ईडीने २८ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश न्यायालयाने दिले.



हेही वाचा -

महानायक हरपला, दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

  1. महाराष्ट्रात 'इथं' साकारलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य मंदिर
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा