कर्नाटक सरकारच्या अत्याचाराला शिवसेनेचा विरोध

 Pali Hill
कर्नाटक सरकारच्या अत्याचाराला शिवसेनेचा विरोध

मुंबई - कर्नाटकमधल्या मराठी भाषकांवर होणाऱ्या अत्याचाराचा शिवसेनेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी निषेध केला. शुक्रवारच्या पालिकेच्या महासभेत तृष्णा विश्वासराव यांनी यासंदर्भातील निवेदन सादर करताना कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला. 1 नोव्हेंबरला पाळण्यात आलेल्या काळा दिन मोर्चात भाग घेणाऱ्यांना घरी जाऊन मारहाण करण्यात येतेय. मोर्चात सहभागी झालेल्या महापौर-उपमहापौरांना कारणं दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्यांच्या भाषणा दरम्यान सुटट्या पैशांचा, नोटाबंदीचा मुद्दाही आला. त्यावर गोंधळ सुरू होऊन अखेर महासभाच तहकूब झाली.

Loading Comments