• 'चर्चा बास, हल्ला करा'
SHARE

फोर्ट - काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात 18 भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी आझाद मैदानात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरीफ या दोघांच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देण्यात आली. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. या प्रसंगी खासदार हुसेन दलवाईंसह अनेक मुस्लीम बांधवही उपस्थित होते. "भारताविरोधात वारंवार कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची हीच खरी वेळ आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा न करता मोदी सरकारने पाकिस्तानवर हल्ला चढवावा," असे खासदार हुसेन दलवाई यावेळी म्हणाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या