रेल्वेत नोकरीसाठी युवकांची निदर्शने


  • रेल्वेत नोकरीसाठी युवकांची निदर्शने
  • रेल्वेत नोकरीसाठी युवकांची निदर्शने
  • रेल्वेत नोकरीसाठी युवकांची निदर्शने
SHARE

आझाद मैदान - किरकोळ मानधनावर अॅप्रेंटीस करणाऱ्या तरुणांना रेल्वेत सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी तरुणांनी गुरुवारी आझाद मैदानात निदर्शने केली.

अनेक तरुण रोजगाराच्या आशेने आयटीआय झाल्यानंतर 1 ते 2 वर्षे अतिशय किरकोळ मानधनावर काम करुन अॅप्रेंटीशिप करतात. त्यानंतर रेल्वेत या युवकांना सामील करून घेतले जाते. त्याचा निर्णय घेण्याचे अधिकार प्रत्येक रेल्वे झोनमध्ये जनरल मॅनेजर यांना आहेत. 2012 मध्ये सर्व प्रशिक्षित युवकांना भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागामध्ये सामील करून घेण्यात आले आहे. पण पश्चिम रेल्वे विभागामध्ये रिक्त जागा असूनसुद्धा 2012 ते आजतागायत वेस्टर्न झोनच्या जनरल मॅनेजर सी. अग्रवाल यांनी या विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घेतलेले नाही. मात्र या विदयार्थ्यांना नोकरीत सामावून न घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे आणि या विदयार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी विदयार्थी उपोषणाला बसले आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या