'बस्स झाले घोटाळे..आता विकास हवा'

 Pali Hill
'बस्स झाले घोटाळे..आता विकास हवा'
'बस्स झाले घोटाळे..आता विकास हवा'
'बस्स झाले घोटाळे..आता विकास हवा'
'बस्स झाले घोटाळे..आता विकास हवा'
See all

मुंबई - नागरिकांना मूलभूत सुविधा द्या आणि मग पेेंग्विनसारखे प्रकार मुंबईत आणा अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसंच मराठी केवळ भाषणामध्ये नाही तर आधी आपल्यात अवगत करा आणि 34 हजार कोटींच्या महानगरपालिकेत खड्ड्यात गेलेले रस्ते, ओसडूंन वाहत असलेले नाले यांना दुरुस्त करुन सर्व स्तरातील मूलभूत सुविधा द्या असेही सुतोवाच या वेळी सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना दिले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.

हा देश चालवायचा असेल तर तो केवळ एकच विचाराने चालेल तो म्हणजे विकास आणि सत्तापरिवर्तन असं स्पष्ट मत सुळे यांनी या वेळी व्यक्त केलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सामाजिक समस्या सोडवण्याच्या उद्देशाने एका नव्या अॅपचं उद् घाटन सुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. केंद्र सरकार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याचं स्वप्न दाखवत आहे. पण, आधी त्यांनी मुंबईकरांना लोकलची उत्तम सुविधा द्यावी, अशी मागणी त्यांनी त्यांच्या भाषणात केली. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर हजारो कोटींच्या प्रकल्पांची स्वप्नं दाखवली जात आहेत. पण हे पैसे आहेत कुठे? असा खडा सवाल त्यांनी केला. त्यामुळे बस्स झाले घोटाळे. मुंबई महापालिकेत आता सत्तापरिवर्तनाची गरज असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास प्रत्येक वॉर्डमध्ये स्वच्छतागृह बांधू, अशी ग्वाही सुळे यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिलाध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्ष अदिती नलावडे, नगरसेविका रत्ना महाले, मीनाक्षी पाटील उपस्थित होत्या.

Loading Comments