एमआयएमच्या रॅलीमुळे नागरिक त्रस्त

 Govandi
एमआयएमच्या रॅलीमुळे नागरिक त्रस्त
एमआयएमच्या रॅलीमुळे नागरिक त्रस्त
एमआयएमच्या रॅलीमुळे नागरिक त्रस्त
See all

गोवंडी - शिवाजीनगरसह परिसरातल्या अनेक भागांत एमआयएम पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई अध्यक्ष शाकीर पटनी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सायंकाळी रॅली काढल्या. या रॅलीत मोठ्या संख्येनं मोटरसायकल घेऊन तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोटरसायकलींचा आवाज आणि त्यांच्या मोठ्यानं वाजणाऱ्या हॉर्नमुळे या रॅली ज्या मार्गांवरून गेल्या, त्या भागातले ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनाही गोंगाटाचा त्रास झाला.

Loading Comments