
2 डिसेंबर 2025 रोजी नगरपरिषद (Nagar parishad) आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (Election) मतदान होत आहे. काही मतदारसंघांमध्ये न्यायालयात अपील दाखल झाल्यामुळे मतदानाच्या दिवशी पूर्वी घोषित केलेली सुट्टी (Holiday) रद्द करण्यात आली आहे.
राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज, मंगळवार 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्रात (maharashtra) अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका अखेर आज होत आहेत. यामध्ये एकूण 226 नगरपरिषद आणि 38 नगरपंचायतींसाठी मतदान सकाळी 7.30 वाजता सुरू झाले आहे.
दरम्यान, 76 नगरपरिषद व नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे.
आता मतदारांचा कौल कोणाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार मार्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 16 जिल्ह्यांमधील नगरपरिषदा/नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजीची सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
यामध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर (कोपरगाव, देवळाली प्रवर, पाथर्डी, नेवासा), पुणे (बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची), सोलापूर (अनगर, मंगळवेढा), सातारा (महाबळेश्वर, फलटण), छत्रपती संभाजीनगर (नानपूर), लामानगर (महाबळेश्वर), लाडकापूर (लालटूर) यांचा समावेश असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.
तसेच (निलंगा, रेणापूर), हिंगोली (वसमत), अमरावती (अंजनगोसुर्जी), अकोला (बाळापूर), यवतमाळ (यवतमाळ), वाशीम (वाशिम), बुलढाणा (देऊळगोराजा), वर्धा (देवळी) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस इ. नगरपालिकांचा समावेश असणार आहे.
हेही वाचा
