Advertisement

राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक


राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक
SHARES

मुंबई - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं ऑफिशियल ट्विटर अकाऊंट @OfficeOfRG हॅक झाल्यानं एकच खळबळ उडालीय. बुधवारी एका अज्ञातानं राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या हॅकर्सनं राहुल गांधींच्या अकाउंटवरून आक्षेपार्ह ट्विट केलंय. तसेच हॅकर्सनं राहुल गांधींची वैयक्तिक माहितीही बदललीय. दरम्यान, अतिशय खालच्या दर्जाचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता सुरजेवाला यांनी ट्विटरवरून दिलीय.

'या प्रकरणाचा निषेध करतो आणि या देशात अशा विकृत विचारधारेला जन्म घालणारी प्रवृत्ती ताकदवान झालेली आहे आणि अशा प्रकारच्या विकृत विचारधारेला खतपाणी घालणारे आज सत्तेवर बसलेत. त्यामुळे हे झालेले आहे ते त्याच विचारधारेमुळे. देशामध्ये अशा तऱ्हेच्या विचारधारेचा प्रभाव वाढतोय याचा काँग्रेस विरोध करणार. या प्रकरणाची उच्च स्तरावर चौकशी करणे आवश्यक आहे. गुन्हेगाराचे धागेदोरे जेव्हा सापडतील तेव्हा देशाच्या एका मोठ्या नेत्याकडे जातील असं दिसत,' असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणालेत. 

संबंधित विषय
Advertisement