'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईकरांना फसवलं'

 Dadar
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईकरांना फसवलं'

दादर - शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या जाहिरनाम्यावर टीका केली. "देवेंद्र फडणीवीस हे अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना फसवलं. गेल्या अडीच वर्षात मुंबईकरांना काहीच दिलं नाही," असे म्हणत राहुल शेवाळेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

"भाजपाचा जाहिरनामा म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. जे अधिकार मुख्यमंत्र्यांचे नाहीत ते अधिकार भाजपाकडे असल्याचे त्यांनी जाहिरनाम्यात दिले आहे. तसेच पारदर्शी कारभार करायचा होता तर गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यानी पालिका आयुक्तांना अधिकार का दिले नाहीत?" असा सवालही या वेळी शेवाळे यांनी उपस्थित केला.

Loading Comments