Advertisement

बायको, मुलीसह मातोश्रीत घुसण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

कर्जाने वैतागलेल्या एका शेतकऱ्याने मुंबई गाठून बायको, मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला.

बायको, मुलीसह मातोश्रीत घुसण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात
SHARES

रायगड जिल्ह्यातील कर्जाने वैतागलेल्या एका शेतकऱ्याने मुंबई गाठून बायको, मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी त्यांना त्वरीत ताब्यात घेतलं. (raigad farmer reach matoshree to meet maharashtra cm uddhav thackeray  )

महेंद्र देशमुख असं या शेतकऱ्याचं नाव असून ते रायगड जिल्ह्यातील शेतकरी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर देखील त्यांच्या कर्जाचा प्रश्न मार्गी न लागल्याने त्यांनी बायको, मुलीसह मातोश्रीबाहेर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तेवढ्यातच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

याआधी जानेवारी महिन्यात देशमुख यांनी मातोश्री या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न केला होता. त्याने जानेवारी महिन्यात हा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं. पण आजपर्यंत त्यांना न्याय मिळू शकलेला नाही. त्यामुळे जून महिन्यापासून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे प्रयत्न सुरु केले. तरीही त्यांची भेट होऊ न शकल्याने. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या पत्नीसह मातोश्री निवासस्थानी येऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement