Advertisement

प्रकृती अस्वास्थामुळे रेल्वे मंत्री पियुष गोयल रुग्णालयात


प्रकृती अस्वास्थामुळे रेल्वे मंत्री पियुष गोयल रुग्णालयात
SHARES

मुंबईच्या दौऱ्यावर असलेले रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

एल्फिन्स्टन परळला जोडणाऱ्या नवीन पादचारी पुलाच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी ते मुंबईच्या दौऱ्यावर होते. सोमवारी एल्फिन्स्टन पुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते सीएसटीएम येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकही घेतली. या बैठकीनंतर सीएसटीएम येथेच ते पत्रकार परिषदही घेणार होते. मात्र अचानक पियुष यांच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा