Advertisement

लोकल प्रवासामुळे मनसे नेते देशपांडे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व काही कार्यकर्त्यांनी सोमवारी लोकल प्रवास केला.

लोकल प्रवासामुळे मनसे नेते देशपांडे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व काही कार्यकर्त्यांनी सोमवारी लोकल प्रवास केला. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू व्हावी यासाठी हे आंदोलन मनसेकडून करण्यात आलं होतं. मात्र, मनाई आदेश असतानाही मनसेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी लोकल प्रवास करत केलेला सविनय कायदेभंग त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. याप्रकरणी मनसेचे सरचिटणीस व अन्य ३ जणांवर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मनसेने सविनय कायदेभंग करत लोकल प्रवास करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही आधी ठरल्यानुसार मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे तसेच अन्य कार्यकर्ते पोलिसांना गुंगारा देत लोकलमध्ये पोहचले. या लोकलप्रवासानंतर मनसे नेत्यांकडून आंदोलन यशस्वी झाल्याच्या प्रतिक्रियाही देण्यात आल्या. 'लोकल सामान्य प्रवाशांसाठी खुली व्हावी. दररोज मुंबईत येण्यासाठी त्यांना जे हाल सहन करावे लागत आहेत, ते थांबावेत, इतकीच आमची मागणी आहे.

याबाबत सातत्याने सरकारला विनंती करूनही आमचं म्हणणं ऐकलं गेलं नाही. त्यामुळं सरकारच्या नाकावर टिच्चून आम्ही कायदेभंग केला आहे', असे संदीप देशपांडे यांनी म्हटलं. दुसरीकडे रेल्वे पोलिसांनी मात्र कायदेभंग करणाऱ्या मनसैनिकांवर कारवाईचे पाऊल उचलले आहे.

या प्रकरणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे व इतर तीन पदाधिकाऱ्यांवर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनातिकीट व दरवाजात लटकून प्रवास करणे, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणे, अशा विविध कारणांसाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या चौघांनाही अटक होण्याची शक्यता आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा